क्रीडाविश्व हादरलं! ठाण्यात कबड्डी खेळाडू १७ वर्षीय तरुणीची हत्या, प्रशिक्षकाला अटक

अल्पवयीन मुलगी इतर मुलांशी बोलते म्हणून आरोपी गणेश संतापला होता. यावरुन त्याने मुलीच्या घरी जाऊन गोंधळही घातला आणि तिच्यासोबत बाद घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins

क्रीडाविश्वाला हादरवणारी एक घटना ठाण्यातून समोर आली आहे. ठाण्यात एका युवा कबड्डी खेळाडूची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खेळाडूच्या हत्येप्रकरणी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीचा मृतदेह 24 मे रोजी कोलशेत परिसरातील त्याच्या घरात सापडला होता. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी मंगळवारी एका आरोपीला याप्रकरणी अटक केली आहे. नवी मुंबईच्या घनसोली परिसरातून गणेश घंबीरराव (वय 23 वर्ष) याला अटक केली आहे. आरोपी मुलाचा कबड्डी प्रशिक्षक देखील होता. 

(वाचा - कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड)

अल्पवयीन मुलगी इतर मुलांशी बोलते म्हणून आरोपी गणेश संतापला होता. यावरुन त्याने मुलीच्या घरी जाऊन गोंधळही घातला आणि तिच्यासोबत बाद घातला. त्यानंतर आरोपीने दोरीच्या साहाय्याने मुलीचा गळा आवळला. एवढ्यावर न थांबता त्याने तिच्यावर चाकूने देखील वार केले. 

(वाचा - पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे महाबळेश्वर कनेक्शन, नियमच धाब्यावर बसवले)

पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा सर्वाची चौकशी केली. त्यावेळी मुलीच्या कुटुंबियांना तिच्या प्रशिक्षकावर संशय होता. पोलिसांना त्या दिशेने चौकशी केली असता या गुन्ह्याचा उलगडा झाला. काबूरबावडी पोलिसांना आरोपीला अटक करुन अधिक तपास सुरु आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article