जाहिरात

Commercial Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात

Commercial Cylinder Price Drop: व्यावसायिक सिलेंडरच्या दरकपातीनंतर आज, 1 मे पासून, मुंबईत सिलेंडर 1699 रुपयांना मिळणार आहे.

Commercial Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात

Commercial Cylinder Price Drop: मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी खूशखबर मिळाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयांची कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्यावसायिक सिलेंडरच्या दरकपातीनंतर आज, 1 मे पासून, मुंबईत सिलेंडर 1699 रुपयांना मिळणार आहे. याआधी ही किंमत 1713.50 रुपये होती. दिल्लीतही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 14.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर सिलेडर आता 1747.50 रुपयांना उपलब्ध होईल. आधी याची किंमत 1762 रुपये होती. 

(नक्की वाचा-  ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर  1851.50 तर चेन्नईत 1906 रुपये असतील. नवीन दर 1 एप्रिल 2025 पासून लागू झाले आहेत.

घरगुती एलपीजीच्या दरात  बदल नाही

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती.

(नक्की वाचा-  Pune News: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना मोठी भेट, वाहतुकीच्या कटकटीतून होणार सुटका)

उज्ज्वला योजने अंतर्गत असलेल्या ग्राहकांनाही ही वाढ लागू होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) च्या लाभार्थ्यांसाठीच्या सिलेंडरची किंमत  500 रुपयांवरून 550 रुपये झाली होती. तर इतर ग्राहकांसाठी सिलेंडरची किंमत 803 रुपयांवरून वाढून 853 रुपये झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: