पुणे शहराजवळचे औद्योगिक नगर असलेल्या पिंपरी चिंचवडधील प्रसिद्ध कंपनीत एक धक्कादायक प्रकार घडलाय. येथील कंपनी कँटीनमधील सामोस्यात कंडोम, गुटखा आणि दगड या किळसावाण्या गोष्टी आढळल्या आहेत. या प्रकरणात चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, येथील एका प्रसिद्ध कंपनीमध्ये सामोसा पुरवठा करण्याचा करार रद्द झाल्याने, संतापलेल्या कंत्राटदाराने नव्याने समोसा पुरवठा करणाऱ्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला होता. या कंपनीनं त्यांच्या कामगारांच्या मदतीने कट रचून समोस्यात कंडोम, गुटखा आणि दगड यासारख्या किळसवाण्या गोष्टी टाकून कंपनीला सामोसे पुरवले.
पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीचं मित्रांनीच केलं अपहरण, पुढं भयंकर घडलं!
मेसर्स मेसर्स एस. आर. एस. एन्टरप्रायझेस असं या प्रकरणातील आरोपी कंत्राटदाराचं नाव आहे. त्यांना येथील प्रसिद्ध कंपनीत सामोसे पुरवण्याचं कंत्राट मिळाले होते. पण, त्यांनी पुरवलेल्या सामोस्यात प्रथमोचार पट्टी आढळल्यानं कंपनीनं हा करार रद्द केला. त्यामुळे संतापलेल्या एस.आर.एस. कंपनीच्या मालकानं कामगार फिरोज शेख आणि विकी शेख या कामगारांना नव्यानं सामोसे पुरवणाऱ्या कंपनीमध्ये रोजंदारीवर पाठवले. या कामगारांनी हा किळसवाणा प्रकार केला.
ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, Zomato नं केली मोठी कारवाई
या प्रकरणात एस. आर. एस. कंपनीचे मालक रहिम शेख, अजहर शेख, मझर शेख आणि कामगार फिरोज शेख आणि विकी शेख यांच्या विरोधात भादवी 328 आणि 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर एका कामगाराला अटक केली आहे.