Zomato अॅपवरुन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील पटियालामध्ये नुकतीच घडली होती. त्यानंतर पीडित कुटुंबानं केकचं ते दुकान खरं नव्हतंच त्याच्या जागेवर दुसऱ्याच शॉपमधून केक आला होता, असा आरोप केला होता. त्यामुळे Zomato वर हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत होता. या सर्व प्रकरणावर ऑनलाईन फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या वतीनं खेद व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या रेस्टॉरंटवरही कारवाई केल्याची घोषणा केली आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार Zomato कडून या संपूर्ण प्रकरणावर वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी रेस्टॉरंटला हटवण्यात आल्याचं सांगितलंय. 'पटियालामध्ये झालेली घटनेचं आम्हाला तीव्र दु:ख आहे. आम्ही रेस्टॉरंटला तातडीनं हटवलंय. त्याचबरोबर मालकालाही आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास बंदी घातलीय. आम्ही संबधित अधिकाऱ्यांना तपासकार्यात पूर्ण सहकार्य करत आहोत, असं या कंपनीकडून यामध्ये सांगण्यात आलं आहे.
गोडवा पसरवणारे पुण्यातील 'घर', खवय्यांसाठी 20 प्रकारच्या पुरणपोळ्यांची मेजवानी
काय आहे प्रकरण?
पंजाबमधील पटियाळामध्ये 24 मार्च रोजी या मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर काही तासांनीच तिचा मृत्यू झाला. तिला केक खाल्ल्यानंतर पहिल्यांदा उल्टी झाली. तसंच श्वास घेण्यात त्रास होत होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली होती. कुटुंबातील अन्य सदस्यही केक खाल्ल्यानंतर आजारी पडले होते. संध्याकाळशी सहाच्या आसपास केक ऑनलाईन ऑर्डर केला होता. रात्री 11 वाजेपर्यंत केक खाणारे सर्वजण आजारी पडले होते, अशी माहिती या कुटुंबीयांनी दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world