संजय तिवारी, नागपूर
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. टीका-टिपण्ण्याच्या राजकारणा दरम्यान एक सुखावणारं दृश्य सोमवारी सायंकाळी पाहायला मिळाले. मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आपल्या मिरवणुकीतून आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातून अचानक धावत भाजप निवडणूक प्रचार कार्यालयात पोहोचले. तिथे बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना भेटत ते थेट कार्यालयाच्या आत दाखल झाले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आत बसलेले भाजप स्थानिक पदाधिकारी त्यांना समोर पाहून किंचित गडबडून जातात. मात्र हसतमुखाने शेळके यांच्याशी हस्तांदोलन करतात. बंटी शेळके पुढे अन्य कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवत सरळ भाजप नेते, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या दिशेने पुढे जातात. त्यांना येताना पाहून प्रवीण दटके हसत हसत उभे राहतात आणि त्यांना आलिंगन देतात.
(नक्की वाचा- अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)
पाहा VIDEO
प्रवीण दटके ह्यांच्यावर मध्य नागपूरचा गड कायम राखण्याची जबाबदारी भाजपने सोपवली आहे. अर्थात निवडणूक रिंगणात दोघे एकमेंकासमोर आव्हान देऊन उभे आहेत. मात्र इथे ते प्रत्यक्ष एकमेकांसमोर हसत हसत उभे असल्याचं दिसून आलं. बंटी शेळके प्रवीण दटकेंना मिठी मारल्यानंतर हसत हसत काहीतरी बोलत हस्तांदोलन करतात आणि चक्क वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करतात.
नक्की वाचा - 'उद्धव ठाकरेंकडून बाण गेला फक्त खान उरले...' मालाडमध्ये 'राज'गर्जना
काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी भाजप कार्यालयात जाऊन त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. आज निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांना पाडून बोलणे, शिव्याशाप देणे हे सारे सुरू असताना भारतीय सभ्यतेचे उदाहरण देणारी ही घटना सोमवारी नागपुरात घडली आहे. या घटनेचा चर्चा संपूर्ण नागपूरमध्ये सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world