Political News : "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला होतील अशी भीती आहे. उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Political News : "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

प्रविण मुधोळकर, नागपूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.  शिंदेंच्याविरोधात भाजप उदय सामंत यांना वापरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, हा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला होतील अशी भीती आहे. उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा- Pankaja Munde : "बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता"; पंकजा मुंडेंनी असं का म्हटलं?)

उदय सामंतांसोबत 20 आमदार- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, "उदय सामंत यांचं थेट नाव घ्यायला पाहिजे होतं. उदय सामंत यांना म्हणूनच डावोसला घेऊन गेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत." 

Advertisement

(नक्की वाचा-  Guardian Minister: पालकमंत्र्यांना काय अधिकार असतात? इतकं महत्त्वाचं का असतं हे पद?)

"मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच उदय करण्याचं निश्चित झालं होतं. मात्र एकनाथ शिंदे सावध झाले आणि ते टळलं. हे सगळे पक्ष फोडतील, शिवेसना फोडतील, राष्ट्रवादी फोडतील फोडा-फोडी हेच त्याचं राजकारण आहे", अशी टीका देखील संजय राऊत यांनी भाजपवर केली. 

Topics mentioned in this article