Congress Meeting : काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, निकालानंतरच्या रणनितीवर होणार चर्चा?

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व विजयी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे असणार आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यात कुणाची सत्ता येणार हे उद्या म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी काँग्रेसने आपल्या निवडून येणाऱ्या आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. निकालानंतर आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकी काय रणनिती आखायची आहे याबाबत काँग्रेसची आज सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. उद्याच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची ही महत्वपूर्ण बैठक असून आमदारांना नेमकं सुरक्षित कुठे ठेवायचं यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

(नक्की वाचा- - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?)

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे विजयी उमेदवारांशी संपर्क साधण्याची आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय काँग्रेसने विजयी आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे. नवनियुक्त आमदार कुणाच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी काँग्रेसकडून घेतली जात आहे. 

(नक्की वाचा- Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल)

रेवंथ रेड्डी आणि डी के शिवकुमार यांच्यावर जबाबदारी

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व विजयी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे असणार आहे.  निकालानंतर आमदारांना गरज पडल्यास कर्नाटक येथे घेऊन जाण्याची शक्यता आहे. बहुमताचा आकडा महाविकास आघाडीने पूर्ण केल्यावरच मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार कोण? यावर सार्वजनिक चर्चा करावी अशा सूचना देखील काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article