विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईबाबत काँग्रेस बॅकफूटवर?

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेणार पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांच्या कारवाईबाबत बॅफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणुगोपाल यांचा इशारा खरा ठरण्याची शक्यता आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेणार पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई होणार नसल्याची माहिती मिळत आहे. 

दिल्लीत या संदर्भात उद्या होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. के सी वेणुगोपाल यांनी मुंबईत म्हटले होते की काय कारवाई होणार हे भविष्यात ठरवले जाईल. त्यामुळे तुर्तास निलंबनाऐवजी आता या आमदारांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती आहे.

(नक्की वाचा - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी?)

कोणत्या आमदारांची मते फुटली?

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांकेतिक पद्धतीने काही आमदारांकडे बोट केलं होतं. त्यानंतर झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके , हिरामण खोसकर, मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. या पाच जणांव्यतिरिक्त आणखी दोन काँग्रेस आमदार कोण?, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याच दोन आमदारांना अभय दिले जाण्याची शक्यता आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार?)

काँग्रेस हायकमांडच्या खास मर्जीतील आणि मराठवाड्यातील एका आमदाराकडे संशयाचे बोट उचलले जात आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याचेही नाव चर्चेत आहे. या आमदाराच्या नावाचा उल्लेख  'त्यांचा' फोटोही पाहिल्यासारखे वाटते आहे, असे म्हणत शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनीही केला होता. 

Topics mentioned in this article