Shivsena MLA : शूटर्सना सुपारी दिली, तारीखही ठरली होती... शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट उघड?

Shivsena MLA Balaji Kinikar : बालाजी किणीकरांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शहरातील शिवसेनेच्याच 2 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथ शहरात शिवसेनेत 2 गट असून याच गटबाजीतून किणीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. 

(नक्की वाचा- VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू)

Balaji Kinikar

(नक्की वाचा- हिंगोलीत पोलिसाचा स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू; अनेकजण जखमी)

त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या २ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मात्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही.

Topics mentioned in this article