जाहिरात

Corona News: सावधान! कल्याणमध्ये आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

त्याला डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याची आरटीपीसीआर टेस्ट 24 मे रोजी करण्यात आली होती.

Corona News: सावधान! कल्याणमध्ये आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू
कल्याण:

कोरोनाचा धसका सगळ्यांनी घेतला होता. त्यानंतर कोरोना गेला. पण आता तो परत आला आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे.  कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दोन दिवसापूर्वी कोरोनामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज बुधवारी पुन्हा कोराना बाधित एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन झाली आहे. आत्तापर्यंत महापालिका हद्दीत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दोन दिवसापूर्वी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्या महिलेची कोरोना टेस्ट केली होती. तिच्या मृत्यूपश्चात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला होता. तिचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घोषित केले होते. आज कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेला 67 वर्षीय रुग्ण हा डोंबिवलीत राहणारा होता. 

ट्रेंडिंग बातमी - ऑस्ट्रेलियात पाठवतो सांगून इराणला उतरवले, 'त्या' 3 तरुणांबरोबर तिथेच भयंकर घडले

त्याला डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याची आरटीपीसीआर टेस्ट 24 मे रोजी करण्यात आली होती. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तो सहव्याधीग्रस्त होता. त्याला हायपरटेन्शनचा आणि मधुमेहाचा त्रास होता.

ट्रेंडिंग बातमी - Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये

त्याच बरोबर त्याला १२ वर्षांपूर्वी आलेल्या स्ट्रोकमुळे पॅरालिसिसस झाला होता. अखेर त्याचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्याने कोविड लस घेतलेली नव्हती. आढळून आलेल्या कोरोनाच्या 8 रुग्णापैकी 2 रुग्णांवर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत. एक रुग्ण त्याच्या घरीच विलगीकरणात आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. तीन रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेने गौरी पाडा येथे आरटीपीसीआर लॅब सुरु केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com