जाहिरात

Pune Corona update : पुण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना व्हायरस, तज्ज्ञांचा इशारा 

सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासात असे आढळून आले की, मागच्या वेळी कोरोनाची लाट पसरली होती तशीची स्थिती आता देखील होत आहे. टाईम्स ऑफ इंडियांने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Pune Corona update : पुण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना व्हायरस, तज्ज्ञांचा इशारा 

Pune Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई, पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने याबाबत माहिती दिली आहे. एनसीएलने सांडपाणी देखरेखीद्वारे हे शोधून काढले आहे. सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासात असे आढळून आले की, मागच्या वेळी कोरोनाची लाट पसरली होती तशीची स्थिती आता देखील होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  देशभरात कोरोनाचे 4,300 हून अधिक रुग्ण, चौथ्या लाटेची चर्चा; मात्र आकडे काय सांगतात?)

एनसीएलचे शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. महेश एस धरणे यांनी म्हटलं की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता जी वाढ होत आहे, ती हळूहळू होत आहे. परंतु सांडपाणी नमुन्यांमध्ये पॉझिटिव्हिटीची लेव्हल मागच्या वेळी संसर्ग वाढण्यापूर्वी होती तितकीच आहे.

लोकांनी सतर्क राहण्याची गरज

कोविडचा प्रसार होतोय हे आधीच समजते. 22 एप्रिल रोजी एसटीपीमधून पहिला नमुना पॉझिटिव्ह आढळला होता. 6 मे पासून, सर्व एसटीपी SARS-CoV-2 RT-PCR द्वारे पॉझिटिव्ह दाखवत आहे. याचा अर्थ पुण्यात कोरोना विषाणू पसरत आहे आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, असंही डॉ. महेश यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा- Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video)

कोविड-19 चा आढावा घेण्यासाठी सांडपाणी निरीक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग बनला आहे. क्लिनिकल केस दिसण्यापूर्वीच संसर्ग शोधण्यात मदत होते. कधीकधी तो आठवडाभरापूर्वीच शोधला जातो. या पद्धतीमध्ये, सांडपाण्याचे नमुने घेतले जातात. नंतर त्यांच्यामध्ये SARS-CoV-2 चे जेनेटिक मटेरियल ओळखले जाते. कोरोना व्हायरस संक्रमित लोकांच्या विष्ठा आणि मूत्रात आढळतो. यामुळे किती लोकांना संसर्ग झाला आहे, हे त्यांना लक्षणे दिसत आहे की नाही किंवा चाचणी झाली आहे की नाही याशिवाय माहिती मिळते. लक्षणे नसलेल्या केसेस आणि नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com