Emotional Video: आई ती आईच असते..वासराची चोरी थांबवण्यासाठी गायीने गो तस्करांना घेरलं, शेवटी नको तेच घडलं

गायीने वासरासाठी हंबरडा फोडल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झालाय. गायीने वासराची चोर करणाऱ्या तस्करांना घामच फोडला. गायीने असं काय केलं? पाहा व्हिडीओ

जाहिरात
Read Time: 2 mins
Cow Tries To Save Calf Video

योगेश लाठकर, प्रतिनिधी

Nanded Cow Video Viral :  नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी एका गाईच्या वासराची चोरी केली. गाईच्या समोरच वासराच्या चोरीचा हा धक्कादायक प्रकार घडला.पण गायीने पोटच्या वासराला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गायीने कार समोर जाऊन वासराची चोरी थांबण्याचा प्रयत्नही केला. परंतु, निर्दयी चोरटे वासराची चोरी करण्यात यशस्वी झाले.गायीने वासरासाठी हंबरडा फोडल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झालाय. गायीचे प्रयत्न निष्फळ जरी ठरले, तरी गायीने वासरासाठी आईच्या मायेची उब दाखवली,हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

वासराला वाचवण्यासाठी गायीने अथक प्रयत्न, पण..

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी गाईच्या वासराची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गायीच्या समोरच वासराची चोरी करून चोरट्यांनी पळ काढल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वासराला वाचवण्यासाठी गायीने अथक प्रयत्न केले पण तिच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर चोरट्यांनी संधी साधून वासराची चोरी केली. या घटनेमुळे नरसी शहरात संतापाची लाट पसरली आहे. 

नक्की वाचा >> Pune News : 'गोल्ड मॅन'ला बिष्णोई गँगची धमकी, "बाबा सिद्धीकीसारखी अवस्था करू.." नेमकं प्रकरण काय?

इथे पाहा गायीचा व्हायरल व्हिडीओ

गायीच्या वासराच्या चोरीच्या घटनेनंतर नागरिक प्रचंड संतापले असून त्यांनी तस्करांवर मोठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नांदेडमध्ये मोठ्या वाहनांमधून गो मातेची तस्करीचं प्रमाण वाढल्याचं सांगितलं जातंय. परंतु, पोलीस या तस्करांना पकडू शकले नाहीत. गो तस्करांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.याप्रकरणामुळे हिंदुत्त्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. 

Advertisement

नक्की वाचा >> CCTV Video : नाशिकमध्ये भीतीचं सावट, सोसायट्यांमधील लोक अलर्ट मोडवर, रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले अन्..

Topics mentioned in this article