क्रिकेटर केदार जाधव क्रिकेटचं मैदान गाजल्यानंतर आता राजकीय मैदानात उतरण्याची शक्यता आहे. केदार जाधव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. केदार विधानभवनात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केदार जाधव भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यासोबत विधानभवनात दाखल झाला. केदार जाधव विधान भवनात नेमका कशासाठी आला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र केदार जाधव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
(नक्की वाचा- विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट? मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करण्याची शक्यता)
केदार जाधवची कारकीर्द
केदार जाधवने भारताकडून 73 सामन्यात 1389 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके तर 6 अर्धशतकांचा समावेश आहे. केदारने भारताकडून 9 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 122 धावा केल्या आहेत. ज्यात 58 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्यांना 95 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1208 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 69 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.