स्वानंद पाटील,बीड
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामखेड येथून अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी खांडेवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल ऑडिओ प्रकरणी खांडेविरोधात परळी शहर आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
(नक्की वाचा: भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी)
एकंदरीतच खांडेच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कुंडलिक खांडेवर भादवी 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता, यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेने खाडेला रात्री उशीरा अटक केली आहे.
(नक्की वाचा: Maharashtra Budget 2024 'त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा...'मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना उत्तर)
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा विश्वासघात करत खांडेने बजरंग सोनवणे यांची कामं केल्याची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडेने या गोष्टीची कबुली देतानाचा कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतही वक्तव्य केले होते.
(नक्की वाचा: 'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?)
आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवराज बांगर याच्यावर वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून खांडेविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत आणखी एक गुन्हा पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस मी शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक होणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world