जाहिरात

Big News: डॉनच्या घरात पैशांचा डोंगर! पैसे मोजण्यासाठी 5 मशिन, धाडीत 'जे' सापडलं ते पाहून भलेभले हादरले

पैशांचा हा डोंगर मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल पाचपेक्षा जास्त नोटा मोजण्याच्या मशिन्स बंगल्यात मागवाव्या लागल्या होत्या.

Big News: डॉनच्या घरात पैशांचा डोंगर! पैसे मोजण्यासाठी 5 मशिन, धाडीत 'जे' सापडलं ते पाहून भलेभले हादरले
  • छत्रपती संभाजीनगरातील मिटमिटा भागात डॉन बाबा फरजानच्या बंगल्यावर पोलीसांनी अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई केली
  • या धाडीत ५ कोटींची रोख रक्कम तसेच २१ लाखांच्या जवळपास सोनं आणि ८ लाखांची चांदी जप्त करण्यात आली
  • घरातून ४ रायफल, ५०० काडतूस, तलवार आणि चाकू यांसह विविध प्रकारची हत्यारं सुद्धा हस्तगत करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर:

मोसीन शेख 

पोलीसांनी एक मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये केली आहे. शहरातील मिटमिटा भागात 90 च्या दशकात प्रचंड दबदबा आणि दहशत असणाऱ्या एका तथाकथित 'डॉन'च्या बंगल्यावर ही करावाई झाली. इथं शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे छापा टाकला. संबंधित 'डॉन'च्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरातच ही अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 21 तास चाललेल्या या थरारक कारवाईने पोलीसांच्या हाती जे जे सापडलं ते पासून धाड टाकणारेच चक्रावून गेले आहे. कोट्यवधींची कॅशसह, सोने, चांदी, हत्यारं अन् बरच काही या धाडीत सापडलं. या कारवाईची बातमी बाहेर येतात संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

ज्या डॉनच्या बंगल्यावर ही धाड टाकण्यात आली त्याचे नाव  बाबा फरजान असे आहे. गुन्हे शाखेने धाड टाकल्यानंतर त्यांना जणू काही खजानाच हाती लागला. बंगल्यात पैशांचा अक्षरश: डोंगर होता. या कारवाईत बंगल्यातील दोन खोल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. त्यात तब्बल 5 कोटींची कॅश मिळाली आहे. यात शंभर रुपयांच्या नोटाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कॅश मिळाली त्यानंतर वेळ होती ती दागिने जप्त करण्याची. जवळपास 21 लाख किंमतीचे सोनं ही जप्त करण्यात आले आहे. शिवाय 8 लाखांची चांदी ही डॉनच्या घरातून सापडली आहे. ती हस्तगत करण्यात आली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Moshi Accident: मोशी दुर्घटनेत सर्वात खळबळजनक खुलासा! कोसळलेली इमारत अनधिकृत? परवानगीच नसल्याचं समोर

 या डॉनची दहशत मोठी होती. त्यामुळे त्याच्या घरातून काही हत्यारं ही जप्त करण्यात आली आगे. त्यात 4 रायफलचा समावेश आहे. त्या सोबतीला 500 काडतूस ही ताब्यात घेण्यात आली. हे कमी की काय तर तलवार,चाकू यांचा ढिग ही पोलीसांच्या हाती लागला आहे. दरम्यान जी रक्कम जप्त करण्यात आली ती बेहिशोबी असल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या रकमेमध्ये सर्वाधिक 100 रुपयांच्या नोटा आहेत. शंभरच्याच नोटा का असा प्रश्न आता पोलीसांना ही पडला आहे. ज्या वेळी पोलिसांनी या नोटा जप्त केल्या त्यावेळी त्यांच्या समोर त्याचा ढिग लागला होता. ते दृष्य पाहून सर्वांनाच  धक्का आणि आश्चर्य वाटले. 

नक्की वाचा - Trending News: ही डॉक्टर तर वाघीण निघाली! थेट पिंजऱ्यात घुसून नरभक्षी वाघीणीला केलं जेरबंद, पिंजऱ्यातला थरार

पैसे ताब्यात घेतल्यानंतर ते मोजण्याचे आवाहन पोलीसां समोर होते. पैशांचा हा डोंगर मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल पाचपेक्षा जास्त नोटा मोजण्याच्या मशिन्स बंगल्यात मागवाव्या लागल्या होत्या. मशिन मागवल्यानंतर ही कॅश मोजली गेली. ती जवळपास पाच कोटीच्या घरात होती. डॉनची अजून काही संपत्ती आहे का याचा ही शोध आता घेतला जात आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश सापडल्याने त्याचे नेटवर्क काय होते. तो कोणाच्या संपर्कात होता याचा ही शोध आता घेतला जात आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर ही कारवाई झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.   

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com