अमजद खान, कल्याण
कल्याण क्राईम ब्रान्चने मोठी कारवाई करत 30 कोटी रुपये किमतीचं तब्बल 3 कोटींचं मेफेड्रोन जप्त केलं आहे. एका किराणाच्या दुकानात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. किराणा दुकान चालवणाऱ्या राजेश तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. राजेश तिवारी हा किराणा दुकानाच्या नावाखाली ड्रग्ज विक्रीचा धंदा करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हा ड्रग्जचा धंदा तो करत होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांना माहिती मिळाली की कल्याणजवळ हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेवाळी परिसरात एका किराण दुकानात ड्रग्ज विक्रीचा गोरख धंदा सुरु आहे. कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे 20 पोलीस कर्मचारी अधिकारी त्या परिसरात पोहचले.
नक्की वाचा- कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यूचं रहस्य वाढलं, CCTV फुटेजमुळे प्रकरणाला नवं वळण
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गायत्री किराणा दुकानात छापा टाकला. या दुकानात पोलिसांना 3 किलो चार ग्राम मेफोड्रोन ड्रग्ज सापडले. या प्रकरणी दुकान चालक राजेश तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. राजेश हा धामटण गावातील एकविरा ढाब्याजवळ कटाई-बदलापूर रोडजवळ राहतो. राजेशसह शैलेंद्र अहिरवार याला देखील आरोपी केले आहे. शैलेंद्र अहिरराव हा ठाण्यातील ढोकळी कोलशेत परिसरात राहतो. पोलीस त्याचा शोध आहेत.
( नक्की वाचा : 'पतीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध बलात्कार नाही' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश तिवारी आणि शैलेंद्र अहिरराव हे ड्रग्ज विक्रीच्या व्यवसाय करत होते. त्यांचे नातेवईक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही ड्रग्ज विक्री करत होते. त्याचा किराणा दुकानाच्या नावाखाली ड्रग्ज विक्रीचा धंदा जोरात सुरु होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्र्ग्जची किंमत 30 कोटी रुपये आहे. नक्की या ड्रग्जच्या धंद्यामागे मोरक्या कोण आहे. राजेश आणि शैलेंद्र यांच्या या धंद्यात काय भूमिका आहे. ड्रग्जच्या या विक्री रॅकेटमध्ये आणखी किती लोक आहेत. याचा खुलासा कल्याण क्राईम ब्रांच सोमवारी करणार आहे.