मुंबई पोलीस कॉन्स्टेबल (Mumbai Police) विशाल पवारच्या (Vishal Pawar) मृत्यूचं रहस्य आणखी वाढलं आहे. विशाल यांनी मृत्यूपूर्वी दिलेली जबानी आणि पोलीस तपासात विसंगती आढललीय. त्यामुळे नवा ट्वि्स्ट निर्माण झालाय. त्यामुळे विशाल पवार यांनी खोटं वक्तव्य का दिलं? याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात एखादा व्यापक कट असण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे.
फटका गँगनं हिसकावला फोन
27 एप्रिल रोजी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना माटुंगामध्ये फटका गँगनं फटका मारत आपला मोबाईल हिसकावला होता. मी त्यांचा पाठलाग केला त्यावेळी त्यांनी विषारी इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध केलं. अनेक तास बेशुद्ध राहिल्यानंतर शुद्धीवर आलो. त्यानंतर मी कसं तरी घरी पोहोचलो आणि मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं,' असं विशालनं त्यांच्या जबानीत म्हंटलं होतं. उपाचारादरम्यान विशाल यांचा मृत्यू झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तपासात काय आढळलं?
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दादर जीआरपीकडून हत्या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि मृत व्यक्तीचे मोबाईल फोन, सीडीआर आणि लोकेशन तपासल्यानंतर विशाल त्यावेळी घटनास्थळी असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकारची कोणतीही घटना तपासात घडलं नसल्याचं समोर आलं आहे. विशाल पवार यांनी संबंधित घटना रात्री 9.30 वाजता झाल्याचं सांगितलं होतं. मात्र ही घटना घडली त्यावेळी रात्री 12 वाजेपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल पवार दादरमधील कैलास लस्सीच्या जवळ असल्याचं दिसलं. रात्री साडेनऊ वाजता घटना घडली असेल तर विशाल तिथे कसा? विशाल पवार यांनी खोटी जबानी दिली का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
( नक्की वाचा : 'पतीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध बलात्कार नाही' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )
विशाल पवार दारु पित असे आणि ही घटना घडली त्यावेळी तो कामावर गेला नाही, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यानं बनाव रचला असा. पण, विशालचा मृत्यू कसा झाला? त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? हे प्रश्न कायम आहेत. विशाल पवारच्या पोस्टमार्टम रिपोर्टची आता पोलिसांना प्रतीक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world