जाहिरात

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराने खळबळ; ड्रग्स तस्कर फैजलने मैत्रिणीवर केला हल्ला

किलेअर्क भागात काल रात्री सुमारे 11 वाजता ही घटना घडली. आरोपी तेजा हा केवळ 8 ते 10 दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता.

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराने खळबळ; ड्रग्स तस्कर फैजलने मैत्रिणीवर केला हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्याच मैत्रिणीवर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद असं आरोपीचं नाव आहे. मैत्रिणीच्या हाताला गोळी लागली असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जामिनावर बाहेर आला होता

किलेअर्क भागात काल रात्री सुमारे 11 वाजता ही घटना घडली. आरोपी तेजा हा केवळ 8 ते 10 दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शस्त्रसाठा, बलात्कार, ड्रग्ज तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एनडीपीएस पथकाने अटक केली होती.

(नक्की वाचा-  Crime News : भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची निर्घृण हत्या, भिवंडीतील घटनेने खळबळ)

गोळीबाराचे कारण काय?

काल रात्री फैजलची मैत्रीण किलेअर्क भागात त्याच्या घरी गेली होती. तिथे त्यांच्यामध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच रागातून तेजाने त्याच्याकडील बंदुकीने मैत्रिणीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागली आणि ती गंभीर जखमी झाली.

(नक्की वाचा-  बॉयफ्रेंडसोबत पळण्यासाठी सर्व हद्द ओलांडली, आईनं दाबला 5 महिन्याच्या मुलीचा गळा)

या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी तेजाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. तसेच, जखमी मैत्रिणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com