Vande Bharat Express Halts: रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दोन प्रमुख 'वंदे भारत एक्स्प्रेस' गाड्यांना नवीन स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. तसेच याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या वंदे भारत गाड्यांना मिळाले नवीन थांबे
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हुबळी–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 20669/20670) या गाडीला आता किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळणार आहे. तर सीएसएमटी–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22225/22226) या गाडीला आता दौंड स्टेशनवर थांबा मंजूर झाला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, या गाड्या लवकरच या नवीन स्थानकांवर थांबण्यास सुरुवात करतील. हा प्रायोगिक थांबा यशस्वी झाल्यास, हे थांबे कायमस्वरूपी केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन ही CSMT स्थानकातून संध्याकाळी 16:05 वाजता सुटते. दादर, ठाणे, कल्याण इथे या गाडीला थांबा असून ती संध्याकाळी 7.10 वाजता पुणे येथे पोहोचते. पुण्यात 5 मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी रात्री 10:40 वाजता सोलापूरला पोहोचते.
(नक्की वाचा- Govt Bank Vacancy 2025 : खुशखबर! 5 महिन्यात सरकारी नोकरी मिळणार..'या' बँकेत 18 हजार पदांसाठी होणार बंपर भरती)
हुबळी–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (20669)
- बुधवार, शुक्रवार, रविवार
- हुबळी - पहाटे 5 वाजता सुटेल
- धारवाड- पहाटे 5:17 वाजता
- किर्लोस्करवाडी - सकाळी 9:45 वाजता
- पुणे दुपारी 1:30 वाजता पोहोचेल
पुणे-हुबळी वंदे भारत (20670)
- सोमवार, गुरुवार, शनिवार
- पुणे - दुपारी 2:15 वाजता सुटेल
- किर्लोस्करवाडी - संध्याकाळी 5:40 वाजता
- बेळगाव - रात्री 8:15 वाजता
- धारवाड - रात्री 10:13 वाजता
- हुबळी - रात्री 10:45 वाजता पोहोचेल.