जाहिरात

Dahisar Bhayandar Link Road : दहिसर ते भाईंदर 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 3 मिनिटात, अखेर वाहतूक कोंडी फुटणार 

सद्यस्थितीत या प्रवासादरम्यान प्रवाशांना 50 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र नव्या लिंक रोडमुळे ही वेळ अवघ्या तीन मिनिटांवर येणार आहे.

Dahisar Bhayandar Link Road : दहिसर ते भाईंदर 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 3 मिनिटात, अखेर वाहतूक कोंडी फुटणार 

dahisar bhayandar link road project : मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गहन होत चालली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही हीच परिस्थिती आहे.  केंद्र सरकारच्या प्रकल्पामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परिणामी दहिसर ते भाईंदर साधारण दहा किलोमीटरचं अंतर अवघ्या 3 मिनिटात पार करता येणार आहे. सद्यस्थितीत वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी 50 मिनिटांचा वेळ लागतो. 

दहिसर ते भाईंदर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या लिंक रोड पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी 53,174 एकर मिठागर जमीन मुंबई महानगरपालिकेला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या जमिनीवर हा लिंक रोड उभारण्यात येणार आहे. ही जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 12.9 कोटी रुपयांत देण्यात आल्याची माहिती आहे. यावर उभारण्यात येणाऱ्या लिंक रोडमुळे दहिसर ते मीरा रोड आणि भाईंदरदरम्यान प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. 

दहिसर-भाईंदर लिंक रोड कसा असेल? 

या लिंक रोडमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचला जाणार आहे. हा 60 मीटर रुंदीचा आणि पाच किलोमीटर लांबीचा मार्ग असेल. सद्यस्थितीत दहिसरहून भाईंदरला जाणाऱ्यासाठी साधारण 10 किलोमीटर अंतर आहे. मात्र मोठ्या वाहतूक कोंडीमुळे यासाठी तब्बल 50 मिनिटं लागतात. नव्या रस्त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता कांदिवलीतील मेट्रो स्थानकाजवळून सुरू होईल आणि उत्तन रोडपर्यंत असेल. याशिवाय भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदानाशी जोडला जाईल. 

केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे दहिसर-भाईंदर नागरिकांना दिलासा

केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील 53,174 एकर मिठागराची जमीन महराष्ट्र सरकारकडे हस्तांतरिक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन दहिसर ते भाईंदर लिंक रोड प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. यासाठी मंजुरीही मिळाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com