जाहिरात

Mumbai News: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात

Mumbai Dahisar Mira Bhayandar Elevated Link Road Project Details: हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नरिमन पॉइंट ते मीरा-भाईंदर हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे

Mumbai News: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात

Dahisar Mira Bhayandar Link Road News:  दहिसर ते भाईंदर दरम्यान प्रस्तावित असलेल्या महामार्गासाठी केंद्रीय मिठागार मंत्रालयाच्या अखत्यारीतील जमीन अखेर राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आल्याने, प्रकल्पातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नरिमन पॉइंट ते मीरा-भाईंदर हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. (Mumbai News) 

 दहिसर ते भाईंदर रोडचा मार्ग मोकळा| Mumbai Dahisar Mira Bhayandar Elevated Link Road 

गेली ४-५ वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मिठागार मंत्रालयाने ५३.१७ एकर जागा मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) माध्यमातून सध्या सुरू असलेला कोस्टल रोड उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून पुढे दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येईल आणि तिथून वसई-विरारला जोडला जाईल. (Nariman Point To Mira Bhayandar Now In Just Half)

Thane Metro Trial : ठाणेकर सुखावले! वाहतूक कोंडीतून सुटका, आज ट्रायल रन; कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या

पुढील तीन वर्षात काम पूर्ण होणार

मंत्री सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, या रस्त्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असून, हे काम लार्सन अँड टुब्रो (L&T) ही कंपनी करणार आहे. या प्रकल्पासाठी येणारा ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या मार्गाला सुरुवातीला उत्तन येथे समुद्रकिनाऱ्यावरून जाण्याचा मार्ग प्रस्तावित होता, त्याला तेथील कोळी बांधवांनी विरोध केला होता. मंत्री सरनाईक यांनी ही मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडल्यानंतर ती मान्य करण्यात आली. त्यामुळे आता हा रस्ता जमिनीवरून जाणार आहे, ज्यामुळे कोळी बांधवांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला आहे. या रस्त्यामुळे मीरा-भाईंदर अधिक चांगल्या प्रकारे मुंबईशी जोडले जाईल आणि लवकरच ते मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा - Ban Heavy Vehicles Decision : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी का बदलला? 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com