Ratnagiri News : जगबुडी नदीचा पूर ओसरला, पण 'ते' संकट मात्र कायम, पाण्यात फिरतेय खतरनाक आकृती

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला तडाखा देणाऱ्या जगबुडी नदीचा पूर ओसरला असला,तरी आता नवीन संकट समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ratnagiri Jagbudi River Flood Video

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Ratnagiri Crocodile Viral Video : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला तडाखा देणाऱ्या जगबुडी नदीचा पूर ओसरला असला,तरी आता नवीन संकट समोर आलं आहे.पुराच्या पाण्यासोबत शहराच्या नागरी वस्तीत शिरलेल्या मगरींचा वावर वाढल्याने खेडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.पुराचे पाणी कमी होताच या मगरी परिसरात दिसून येऊ लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

कुंभारवाडा परिसरात मगरींचा वावर

खेड शहरातील सखल भागातील कुंभारवाडा परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं होतं.आता पाणी पातळी कमी झाली  असली,तरी या भागातील ओल्या आणि चिखलमय परिसरात मगरींचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Advertisement

नक्की वाचा >> World News : जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश, हजार लोकही राहत नाहीत, यामागचं कारणंही थक्क करणारं

व्हिडिओ व्हायरल,नागरिकांमध्ये घबराट

शहराच्या जवळच एका मगरीचा वावर असल्याचे समोर आल्यानंतर त्या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.पुराचे पाणी ओसरल्यानंतर मगरी सुरक्षीत जागी जाण्याऐवजी मानवी वस्तीच्या दिशेने सरकत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.

नक्की वाचा >> मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या

त्यामुळे वन विभागाने तातडीने या मगरींना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित कराव,अशी  मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावं,असं आवाहन करण्यात आलं आहे.