Pune News : अजित पवार वेळेआधीच उरकलं उद्घाटन; भाजप खासदाराची दादांसमोरच चिड-चिड 

Pune News : खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पुण्यातील विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान नाराजीनाट्य पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनाला उपस्थित होते. अजित पवारांना नियोजित वेळेाआधीत उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला. त्यानंतर तिथे आलेल्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं होतं. यामुळे मेधा कुलकर्णी यांची थोडी चिड-चिड झाली. "मी येण्याआधी 6.30 वाजताच इमारतीचं उद्घाटन केलं", असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी केला. यावर अजित पवार यांनी "मला काही माहीत नव्हतं, परत उद्घाटन करु", असं स्पष्टीकरण दिलं. 

Advertisement

घडलेल्या प्रकाराबद्दल मेधा कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितलं की, मी विषय वाढवणार नव्हते, तुम्ही विचारलं म्हणून सांगते. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे 10 मिनिट आधीच उद्घाटन झालं, मला याचं नक्कीच वाईट वाटतं. माझी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा.

(नक्की वाचा-  MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)

Ajit Pawar

प्रोटोकॉलनुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होते. बस किंवा फ्लाईट आपण ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच ना. जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये. मी 10 मिनिट आधी पोहोचले होते. पण दादांनी 20 मिनिटींपूर्वीच उद्घाटन केलं, असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.  

पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल. आमचे तिन्ही नेते जास्तीत जास्त काम करतात, ते आमचे आदर्श आहेत. अजितदादांनी वेळेच्या पूर्वीच उद्घाटन करू नये एवढीच विनंती आहे, असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  Pune News: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना मोठी भेट, वाहतुकीच्या कटकटीतून होणार सुटका)

महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही- अजित पवार

आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या महामंडळाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली.

Advertisement