जाहिरात

MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी

MHADA Home : कोकण मंडळातील एकूण 13 हजार 395 घरे यातून विक्रीसाठी आहेत. त्यामुळे नागरिकांना हवे ते घर निश्चित करून खरेदी करता येणार आहे.

MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी

MHADA Home Offer : म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या विक्रीसाठी बुक माय होम संकल्पना मांडली आहे. बुक माय शोच्या धर्मीवर ही म्हाडाची संकल्पना आहे. कोकण मंडळात अनेक घरांची विक्री होत नसल्याने म्हाडाने ही शक्कल लढवली आहे. म्हाडाच्या या उपक्रमाला प्रतिसात मिळेल अशी अपेक्षा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार - बोळिज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथे अनेक घरांची विक्री झालेली नाही. या घरांच्या विक्रीसाटी कोणतीही सोडत न काढता, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वाने घरांची विक्री न करता आता थेट आवडेल ते घर खरेदीचा पर्याय ठेवला आहे. 

(नक्की वाचा-  ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

कोकण मंडळातील एकूण 13 हजार 395 घरे यातून विक्रीसाठी आहेत. त्यामुळे नागरिकांना हवे ते घर निश्चित करून खरेदी करता येणार आहे. म्हाडाने या उपक्रामासाठी https:// bookmyhome. mhada. gov. in/ असे नवीन संकेतस्थळ तयार केले आहे.  बुधवारपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. 

(नक्की वाचा-  Pune News: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना मोठी भेट, वाहतुकीच्या कटकटीतून होणार सुटका)

कोकण मंडळातील विरार - बोळिजमधील म्हाडाच्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पातील घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. येथील कोणत्याच प्रकारच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने ती धुळखात पडली होती. त्यामुळे आतातरी या घरांच्या विक्रीली प्रतिसाद मिळेल अशी आशा म्हाडाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: