संजय तिवारी, नागपूर
पुण्यानंतर गुईलेन बॅरे सिंड्रोम आता राज्यभर पाय पसरताना दिसत आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतर आता नागपुरात जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील जीबीएस रुग्णाच्या मृत्यूचं हे पहिलच प्रकरण आहे. राज्या आतापर्यंत जीबीएसमुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे नागपुरच्या पारडी येथील रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती असताना शुक्रवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या दोन्ही हात आणि पायाना पक्षाघात झाला होता. तर न्युमोनिया झाल्याने श्वसनाला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जीबीएसचे आणखी दोन रुग्ण अतिदक्षता विभागात भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील एका 60 वर्षीय महिलेचा शुक्रवारी जीबीएसमुळे मृत्यू झाला होता. महिलेवर गेल्या काही दिवसांपासून सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएसच्या पहिल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
- अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
- अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे.
- डायरिया (जास्त दिवसांचा)
(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का?)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा