अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Crime News : कल्याण शहरातील प्रसिद्ध विकासक मंगेश गायकर यांच्या वडवली येथील नवीन गृहप्रकल्पात बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम मिळाले नाही.आमच्याकडून सप्लाय घ्या नाहीतर प्रत्येक गाडीमागे तीन हजार रुपये द्या,अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी वैभव पाटील यांनी केली होती, असा आरोप विकासक मंगेश गायकर यांनी केला आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. विक्री कार्यालयात घुसून कार्यालयातील कर्मचारी आणि मजुरांना धमकी दिल्याच्या सीसीटीव्ही विकासकाने पोलिसांना दिला आहे.या घटनेने कल्याण परिसरातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगेश गायकर हे स्थानिक स्तरावर प्रतिष्ठित विकासक आणि माजी भाजप नगरसेवक म्हणून ओळखले जातात. स्थानिक असलेल्या गायकर यांनाही अशा प्रकारे बांधकाम रोखण्यास भाग पाडले गेल्याने विकासकांच्या संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे.खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासक मंगेश दशरथ गायकर (५८) यांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.यामध्ये वैभव दुर्योधन पाटील,पंकज दुर्योधन पाटील,सुनील राजाराम पाटील,उध्दव राकेश पाटील,ध्रुव जनार्दन पाटील,करण सुधीर पाटील हे सर्व वडवली गावात राहणारे आहेत.वैभव पाटील हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा पदाधिकारी आहे.
नक्की वाचा >> 32 चेंडू..318 चा स्ट्राईक रेट, 10 चौकार अन् 9 षटकार, वैभव सूर्यवंशीने ठोकलं वादळी शतक! गगनचुंबी सिक्सरचा Video
मंगेश गायकर यांनी तक्रारीत काय म्हटलंय?
मंगेश गायकर यांच्या तक्रारीनुसार,काही दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास आरोपी हातात लाकडी दांडके घेऊन ‘मंगेश स्टार',‘मंगेशी हेवन'आणि ‘जेमिनी'या प्रकल्पांवर आले.त्यांनी विक्री कार्यालयात घुसून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.यावेळी सुनील पाटील यांनी "आम्हाला काम देत नाही का?"असे विचारत कर्मचार्यांना शिवीगाळ केली.वैभव दुर्योधन पाटील यांनी “शामल कोठे आहे? हिम्मत असेल तर इथे येऊ दे”असे म्हणत धमक्या दिल्या.यानंतर टोळक्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडूनच घेण्याची सक्ती केली. तसे न केल्यास प्रत्येक वाहनामागे 3 हजार रुपये देण्याची मागणी केली.मागण्या पूर्ण न झाल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नक्की वाचा >> 32 चेंडू..318 चा स्ट्राईक रेट, 10 चौकार अन् 9 षटकार, वैभव सूर्यवंशीने ठोकलं वादळी शतक! गगनचुंबी सिक्सरचा Video
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
याबाबत वैभव पाटील यांनी म्हटलंय की, व्यवसायासंदर्भात त्यांच्यासोबत याआधी बैठका झाल्या होत्या.स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल या हेतून त्यांच्याकडे काम मागण्यासाठी गेलो होतो. मात्र कोणत्याही प्रकारची खंडणी मागितली नसून ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांची ही चाल असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.