Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मनमानी कारभार; आणखी एक प्रकार उघडकीस

Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे एक धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे. त्याला गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी 60 टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News : गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत सापडलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण रुग्णालयातल्या 20 टक्के नव्हे तर 60 टक्के खाटा गरिबांसाठी राखीव होत्या, मात्र त्याचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातील कागदपत्रे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दीनानाथ मंगेशकर या ट्रस्टवर सुरुवातीला विभागीय आयुक्त ट्रस्टी होते. नंतर मात्र यातून विभागीय आयुक्तांना वगळण्यात आले. धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. अलीकडील घटनांमुळे या नियमांचे पालन होत असल्याबाबत शंका निर्माण झाली आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला आहे.     

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे एक धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे. त्याला गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी 60 टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. धर्मादाय रुग्णालयांसाठी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 क नुसार, धर्मादाय रुग्णालयांना खाटा राखीव ठेवण्यासाठी काही नियम आहेत.   

ट्रेंडिंग बातमी - Income Tax विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी 314 कोटींची नोटीस, पुढे काय झालं?

वार्षिक उत्पन्न 1.60 लाखांपर्यंत असलेल्या रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी 10 टक्के खाटा राखीव. तर याच उत्पन्न गटातील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचारासाठी 50 टक्के खाटा राखीव असतील, असा नियम आहे. या नियमांचे पालन न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाऊ शकते.   

Advertisement

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिला तनिषा भिसे यांना तातडीच्या उपचारासाठी दाखल करून न घेतल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या धर्मादाय स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Topics mentioned in this article