
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाकयुद्ध काही थांबताना दिसत नाही. दोघे एकमेकांवर टिका करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. शिवाय त्यांच्यातला व आपल्यात फरक ही सांगितला. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फेसबूक लाईव्ह करायचे. त्यामाध्यमातून ते जनते बरोबर संवाद साधत होते. यावरून शिंदे यांनी ठाकरे यांना टोले लगावले आहेत. ते बंगल्यात बसून FB खेळत बसायचे. FB म्हणजे काय तर फुकट बाबूराव. अशी शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना डिवचलं. पुढे शिंदे म्हणाले, मी सुद्धा FB आहे. पण मी महाराष्ट्राचा FB आहे. म्हणजे फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ आहे. फरक आहे. फरक बघा. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपल्यातला फरक जाहीर पणे सांगितला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, फडणवीस सरकारवर आपण नाराज नाही. आमच्या खुर्च्या बदलल्या आहेत हे खरं आहे. खुर्च्या बदलल्या, पद बदलली, पण आमची मन नाही बदलली असं ही शिंदे यावेळी म्हणाले. मला लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख मिळाली. ती सगळ्या पदा पेक्षा मोठी आहे. आमची पदे बदलली, खुर्च्या बदलल्या पण मने बदलली नाही. इरादे बदलले नाहीत. दिल भी वही, हौसले भी वही कायम है, प्राण जाये पर वचन न जाए, असं म्हणत त्यांनी आम्ही या पुढे ही काम आम्ही करत राहू असं स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - Income Tax विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी 314 कोटींची नोटीस, पुढे काय झालं?
पद आज आहे उद्या नाही. पण तुम्ही सोबत आहात ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. लाडक्या बहीणींना सांगतो. विरोधक म्हणत आहेत की ही योजना बंद होणार, पण लाडकी बहीणी योजना कधीही बंद होणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणूकीत फेक नरेटीव्ह पसरवलं गेलं. पण त्याचा हिशोब विधानसभा निवडणुकीत जनतेने चुकता केला असंही शिंदे यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world