रेवती हिंगवे, पुणे
Pune News : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात १६ चितळ जातीच्या हरणांचा मृत्यू लाळखुरकूत आजारामुळे झाल्याचे समोर आले आहे. या हरणांना दिलेला खुराक चांगला होता की नाही? यावरून प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांवरच कारवाईची शक्यता आहे
महापालिका आयुक्तांनी कडक पाऊल उचलत उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. चार दिवसांत त्यांना खुलासा करण्याचा आदेश दिले आहेत.
( नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )
कात्रज प्राणिसंग्रहालयात ९९ हरणे आहेत. ७ ते १२ जुलैदरम्यान १६ हरणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. पुणे महापालिका प्राणिसंग्रहालयावर, प्राण्यांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते करण्यात येतो तरी देखील मृत्यू कसा काय झाला असा प्रश्न उपस्थित झाला होता. शवविच्छेदन व नमुना तपासणीसाठी विविध संस्थांचा सहभाग घेतला. भुवनेश्वरच्या राष्ट्रीय लाळ खुरकूत संशोधन केंद्राच्या अहवालातून लाळ खुरकूत विषाणूंमुळे हरणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
(नक्की वाचा- 'अरे पिसाळलेल्या XX', 'वंचित' कडून जितेंद्र आव्हाडांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ का? वाचा Inside Story)
पुणे मनपा आयुक्तांनी संग्रहालयातील प्राण्यांची देखभाल कशी घेतली जात होती, त्यांना योग्य पद्धतीचा खुराक दिला जात होता का? जर खुराक योग्य होता; तर मग हरणांना लाळ खुरकूत आजार कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. जर खुलासा समाधानकारक नसेल, तर त्यापुढे कारवाई होण्याची शक्यता आहे.