Mumbai News: दिल्लीमध्ये सध्या पडलेल्या दाट धुक्यामुळे तेथील हवाई वाहतूक आणि विमान सेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. धुक्यामुळे दृश्यमानता (Visibility) कमी झाल्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानांनाही त्याचा फटका बसला आहे. एअर इंडियाच्या प्रवाशांना बराच वेळ विमानतळावर थांबावे लागले.
विमानाची वेळ आणि उशीर
मुंबईतून दिल्लीसाठी या विमानाची मूळ उड्डाण वेळ सकाळी 5.10 वाजेची होती.धुक्याच्या कारणामुळे एक दिवस आधीच ही वेळ बदलून सकाळी 05.45 करण्यात आली होती. मात्र सकाळी 7.14 वाजून गेले तरी हे विमान मुंबईतून उडालेच नव्हते. म्हणजेच मूळ वेळेपेक्षा हे विमान दोन तासांहून अधिक काळ उशीराने होते. अखेर प्रवाशांना मोठ्या विमानातून लहान विमानात बसवण्यात आले.
(नक्की वाचा- Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं)
खासदारही प्रवासात खोळंबले
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय दिना पाटील हे देखील याच एअर इंडियाच्याविमानाने प्रवास करत होते. विमानाला झालेल्या विलंबामुळे त्यांनाही बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीतील धुक्यामुळे विमानांच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होत आहेत. व्यावसायिक आणि महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे.
(नक्की वाचा- Dhule News: कार दुरुस्त करण्यासाठी आला पण घरी परतलाच नाही; ट्रकच्या धडकेत मॅकेनिकचा मृत्यू)
हवाई वाहतूक नियंत्रकांकडून विमानांना सुरक्षित उड्डाणासाठी आणि लँडिंगसाठी योग्य योग्य दृश्यमानतेची गरज असते. धुक्यामुळे ही दृश्यमानता कमी झाल्यामुळे विमानांना त्यांच्या वेळेनुसार उड्डाण करण्याची परवानगी दिली जात नाही.