भयानक! एक डुलकी अन् आधी बस उलटली, मग खड्ड्यात कोसळली! दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 40 भाविक जखमी

Rajasthan Road Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अलवरजवळ 40 प्रवाशांनी भरलेली स्लीपर बस खड्ड्यात उलटून भीषण अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Delhi-Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात"
NDTV Reporter

Delhi-Mumbai Expressway Accident: राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात शनिवारी (23 मे) सकाळी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात (Delhi Mumbai Expressway Accident) झाला आहे. रैणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रवासी स्लीपर कोच बस उलटल्याने दुर्घटना घडली. चुकीच्या मार्गात प्रवेश केल्यानंतर बस आधी उलटली आणि मग रस्त्याशेजारी असणाऱ्या खड्ड्यात कोसळली. भीषण अपघातानंतर घटनास्थळ किंकाळ्यांना हादरून गेले. बसमधील सर्व 40 प्रवासी जखमी झाले आहेत. 

भाविक गोवर्धनच्या दिशेनं करत होते प्रवास 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मध्य प्रदेशातील श्योपूर येथून उत्तर प्रदेशातील गोवर्धन येथे जात होती. अधिक मास असल्यामुळे ब्रिज 84 कोसची परिक्रमा सुरू आहे, यासाठीच बसमधील बहुतांश प्रवासी गोवर्धन जी येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा ऐकण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते.  

Advertisement

कसा झाला हा रस्ता अपघात?

प्राथमिक तपासातील माहितीनुसार, बस भरधाव होती तसेच ड्रायव्हरला झोप देखील आली होती. त्यात वाहन चुकीच्या लेनमध्ये असल्यामुळे आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट एक्सप्रेसवेवरून खाली खड्ड्यात कोसळली. 

(नक्की वाचा : Thane Cloudburst Like Rain: ठाण्यात ऐन कडक उन्हाळ्यात आभाळ फाटलं; मुरबाडमधील 'या' तीन ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस)

6 प्रवाशांची प्रकृती गंभीर 

अपघाताची माहिती मिळताच रैणीचे पोलीस ठाणे प्रभारी बनेसिंह मीणा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक आणि NHAI चे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य सुरू करून NHAIच्या रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व 40 जखमींना तातडीने पिनान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते सहा प्रवाशांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, ज्यांना पुढील उपचारासाठी अलवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते.

40 प्रवासी जखमी

(नक्की वाचा : Mumbai Rain Update: मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे, पावसाचा यलो अलर्ट जारी! IMDचा महत्त्वाचा इशारा

JCBच्या मदतीने हटवली बस 

सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात पाठवल्यानंतर NHAI च्या पथकाने घटनास्थळी जेसीबी तसेच क्रेन मागवण्यात आली आणि खड्ड्यात अडकलेली बस सरळ करून तेथून हटवण्यात आली. पोलीस आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. दरम्यान दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर वेग आणि निष्काळजीपणामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. 30 एप्रिल रोजीच येथे एका सीएनजी कारला आग लागल्याने सात लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता.