जाहिरात

Mumbai Rain: मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे, पावसाचा यलो अलर्ट जारी! IMDचा महत्त्वाचा इशारा

Mumbai Rain Yellow Alert: भारतीय हवामान विभागाने 23 मे रोजी मुंबईसह तीन जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांत पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Rain: मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे, पावसाचा यलो अलर्ट जारी! IMDचा महत्त्वाचा इशारा
"Mumbai Rain Yellow Alert: सावधान! मुंबईत पावसाचा यलो अलर्ट"
Canva

Mumbai Rain Yellow Alert: राज्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असतानाच आता काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (23 मे) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास तत्काळ इशारा (Nowcast Warning) जारी केली आहे. या सूचनेनुसार पुढील 3 तासांत मुंबईसह तीन जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट| Mumbai Rain Yellow Alert News

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रामुख्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट आहे. या तीनही ठिकाणी हवामान खात्याने 'यलो अलर्ट' (Yellow Warning) जारी केला असून येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

(नक्की वाचा: Thane Cloudburst Like Rain: ठाण्यात ऐन कडक उन्हाळ्यात आभाळ फाटलं; मुरबाडमधील 'या' तीन ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस)

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे वीकेंडला सकाळीच बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची तारांबळ उडू शकते. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.

(नक्की वाचा : निसर्गाची अग्निपरीक्षा! देशातल्या या राज्यात 50°C पार पोहोचला होता पारा, तेव्हाची स्थिती ऐकून अंगावर येईल काटा)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

22 मे रोजी देखील मान्सूनपूर्वी पावसाची नोंद

शुक्रवारी (22 मे) सकाळी देखील मुंबईतील मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग यासारख्या पूर्व उपनगरातील भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रातही हवामानात बदल दिसत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com