- मनोज सातवी, प्रतिनिधी
Thane Cloudburst Like Rain: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. शुक्रवारी (22 मे) तालुक्यामध्ये अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी संकटामुळे परिसरातील बळीराजा आणि वीट उत्पादक व्यावसायिक पुरते हवालदिल झाले असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
वाल्हिवरे, केळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस | Thane Cloudburst Like Rain | Murbad Rain News
मुरबाड तालुक्यातील वाल्हिवरे, केळेवाडी आणि खुटल परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासांतच संपूर्ण परिसर जलमय झाला.
नदी-नाले ओसंडून वाहिले, नागरिकांची तारांबळ
अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी आणि नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने वाहतुकीवरही याचा काही काळ परिणाम झाला. बाजारात किंवा कामाधंद्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची या अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड तारांबळ उडाली. सुरक्षित जागा शोधण्यासाठी लोकांची एकच पळापळ झाली.
शेतकरी आणि वीट उत्पादकांना मोठा फटकाया अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका स्थानिक शेतकरी आणि वीट व्यावसायिकांना बसला आहे.
VIDEO: Heavy Rains | ठाण्यातील मुरबाड तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस, रस्त्यांना नदीचं रूप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world