सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील. गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, "2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता एक मास्टर प्लॅन तयार आहे. मास्टर प्लॅनमध्ये 11 पूल आणि अनेक रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, टेंट सिटी आणि सहभागींसाठी निवासी सुविधा, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पवित्र जलाशयांचे जीर्णोद्धार आणि नवीन घाटांचा विकास यासह नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय)
गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.