Solapur Ghongade Wasti Temple : सोलापूरातील घोंगडे वस्ती येथील जमिनी नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवी मंदिरात शुक्रवारी सकाळी एक अद्भुत घटना घडल्याची चर्चा रंगली आहे.अधिक पुरुषोत्तम मासाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात.पण शुक्रवारी सकाळी एक आगळीवेगळी घटना घडल्याच्या चर्चा रंगल्या .सकाळपासूनच मंदिरातील घंटा अचानक गोल फिरू लागल्याची चर्चा पसरली.त्यानंतर या मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली.या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
'भाविकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये'
मंदिरातील घंटा कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय हालू लागली ,असा अंदाज काहिंनी व्यक्त केला आहे.मंदिरात चमत्कार घडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.त्यामुळे काही भाविकांनाही या घटनेमागचं सत्य जाणून घ्यायचं होतं.या घटनेमुळे अनेक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी आणि हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी मंदिराकडे धाव घेतली.यावेळी पुजाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
नक्की वाचा >> Beed News: पतीला चिकन राईस आणायला पाठवलं, पत्नीचा इन्स्टाग्रामवर सुरु झाला भयानक खेळ, प्रियकराने संधी साधली
मंदिरात घंटा अचानक फिरत होती का?घंटा फिरण्यामागचं नेमकं कारण काय?भाविकांसाठी हा चमत्कार आहे की अफवा? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दरम्यान,भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते.त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी उसळली होती,असं काही लोकांचं म्हणणं आहे.अशातच मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ कायम होती.आत्ता यामागे नेमकं सत्य काय आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.