जाहिरात

Beed News: पतीला चिकन राईस आणायला पाठवलं, पत्नीचा इन्स्टाग्रामवर सुरु झाला भयानक खेळ, प्रियकराने संधी साधली

आरोपींची कसून चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी प्रियंकाने किरणला चिकन राईस आणण्यासाठी बाहेर पाठवलं होतं. प्रियंकाने याबाबत तिचा प्रियकर दशरथ परदेशीला सांगितलं होतं.

Beed News: पतीला चिकन राईस आणायला पाठवलं, पत्नीचा इन्स्टाग्रामवर सुरु झाला भयानक खेळ, प्रियकराने संधी साधली
Beed Murder Case News Today

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Beed Murder Case : बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील लिंबागणेश परिसरात 31 मे रोजी रस्त्यालगत किरण सोनवणे नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळूला होता.तसच घटनास्थळी दुचाकीही सापडली होती.ही घटना अपघात असल्याचं सुरुवातीला निदर्शनास येत होतं. परंतु, पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं उघड झालं.याप्रकरणी किरण सोनवणेची पत्नी प्रियंका सोनवणे,तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि मित्र धीरज येडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

आरोपीने हत्येनंतर अपघाताचा बनाव केला

आरोपींची कसून चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी प्रियंकाने किरणला चिकन राईस आणण्यासाठी बाहेर पाठवलं होतं. प्रियंकाने याबाबत तिचा प्रियकर दशरथ परदेशीला सांगितलं होतं.त्यानंतर परदेशीने त्याचा मित्र धीरज येडे याच्यासोबत संगनमत करून किरण सोनवणेची गळा आवळून हत्या केली.धक्कादायक म्हणजे दुचाकी त्याच्या अंगावर चढवून अपघाताचा बनवा केला होता.

नक्की वाचा >> Solapur News: मुख्याध्यापकाने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं , घटनास्थळी सापडली 22 पानी सुसाईड नोट

दशरथ प्रियंकाला म्हणाला, 'कार्यक्रम ओके'

गळा आवळून किरण सोनवणे याची हत्या केली आणि दुचाकी त्याच्या अंगावर ठेवून अपघाताचा बनाव केला.हत्येनंतर दशरथने प्रियंकाला फोन करून 'कार्यक्रम ओके' असं सांगितलं.त्यानंतर रात्री इन्स्टाग्रामवर चार ते पाच तास दोघांचा संवाद सुरु होता.याप्रकरणी पोलिसांनी अनेक डिजिटल पुरावे हस्तगत केले आहेत.आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रियंका सोनवणेला तिचा पती दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याचंही कारण आरोपींकडून सांगितलं जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com