जाहिरात

Solapur News: मुख्याध्यापकाने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं , घटनास्थळी सापडली 22 पानी सुसाईड नोट

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

Solapur News: मुख्याध्यापकाने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं , घटनास्थळी सापडली 22 पानी सुसाईड नोट
Solapur Headmaster Family Suicide Case

Solapur Crime News : सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार,शेअर बाजारातील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळे ते गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. घटनास्थळावरून पोलिसांना 22 पानी सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि कर्जाचा तपशील नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Jalna News: एका घटनेमुळं जालन्यात शुकशुकाट, नामांकित शाळेच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट

शुक्रवारी सकाळी दरवाजा न उघडल्याने संशय बळावला

मृतांमध्ये पत्नी माधुरी पाटील,मुलगा अथर्व पाटील आणि शिवांश पाटील यांचा समावेश आहे.शुक्रवारी सकाळी दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडल्यानंतर ही घटना उघड झाली. दरम्यान,पत्नी व मुलांच्या मृत्यूप्रकरणी योगेश पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.या घटनेमुळे हत्तीज गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com