जाहिरात

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार? लोकसभेत नेमकं काय घडलं?

Dhananjay Munde : कालच अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. तर आता दुसरीकडे मुंडेंच्या काळातील विमा घोटाळ्याची देखील आता चौकशी होणार आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार? लोकसभेत नेमकं काय घडलं?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे राज्यात 5 हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मंगळवारी लोकसभेत हा मुद्दा मांडला. 

यावर आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. कुठे गडबड झाली तर गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कालच अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. तर आता दुसरीकडे मुंडेंच्या काळातील विमा घोटाळ्याची देखील आता चौकशी होणार आहे.

(नक्की वाचा- अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे, धनंजय मुंडे स्पष्ट बोलले)

धंनजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी डीपीसीत मंजूर केलेल्या 800 कोटींच्या कामांच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. कृषी साहित्य खरेदीत धनंजय मुंडेंचा 245 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 

(नक्की वाचा - Anjali Damania : धनंजय मुंडेंवर 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, अंजली दमानियांनी पुरावेच सादर केले)

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात 5 हजार कोटींचा पीक विमा घोटाळ्याची केंद्र चौकशी करणार आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना वाचवत असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांच्यावर झाला आहे. त्यामुळे एकामागून एक होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Dhananjay Munde, Dhananjay Munde Allegations, धनंजय मुंडे