Mla Room Issue : आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर

Mla room issue : कॅबिनेट किंवा राज्यमंत्री यावर नियुक्त झाल्यानंतर मंत्र्यांनी आकाशवाणीमधील आमदार निवासाची रूम सोडणे गरजेचे आहे. मात्र असे काही मंत्री आहेत की त्यांनी स्वतःला शासकीय बंगला देखील घेतला आहे आणि आमदार निवासातील रूम देखील ठेवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील आमदार निवासमध्ये रूम मिळावी यासाठी आमदारांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. यातून काही आमदारांमध्ये तर चक्क भांडण होत आहेत. अशातच राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी मात्र टुमदार शासकीय बंगल्यांबरोबरच आमदार निवासातील रूम देखील ठेवले आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी स्वतःच्या सत्तेचा अतिरिक्त उपभोग घ्यायचं ठरवल्याचं दिसून येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कॅबिनेट किंवा राज्यमंत्री यावर नियुक्त झाल्यानंतर मंत्र्यांनी आकाशवाणीमधील आमदार निवासाची रूम सोडणे गरजेचे आहे. मात्र असे काही मंत्री आहेत की त्यांनी स्वतःला शासकीय बंगला देखील घेतला आहे आणि आमदार निवासातील रूम देखील ठेवली आहे.

वास्तविक मुंबईमध्ये मॅजेस्टिक आमदार निवास तसेच मनोरा आमदार निवास याचे काम सध्या सुरू आहे. अवघे आकाशवाणी आमदार निवास आणि विस्तारित आमदार निवास हेच सध्या उपलब्ध आहेत. आमदारांची संख्या जास्त आणि आमदार निवासस्थानामधील रूम कमी अशी परिस्थिती आहे. 

(नक्की वाचा - CIDCO Lottery 2025: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' मिळाले, आता पुढे काय? 'या' गोष्टी करणं बंधनकारक)

त्यातच अनेक मंत्री स्वतःच्या शासकीय निवासस्थानासोबतच रूम देखील आपल्याजवळ ठेवत आहेत. यामुळे नव्या आमदारांना आमदार निवासस्थानात रूम मिळत नाही. या संपूर्ण प्रकरणात काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

गिरीश महाजन, संजय सावकारे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, जयकुमार रावल, अतुल सावे, अशोक विके, शंभूराजे देसाई, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, पंकज भोयर, योगेश कदम, इंद्रनील नाईक हे कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत, ज्यांना शासकीय बंगला देण्यात आला तरी त्यांनी आमदार निवासातील रुम देखील ठेवली आहे. दुहेरी फायदा घेण्याचं काम सत्तेचा वापर करत हे नेते करत असल्याचे दिसून येत आहे.

(नक्की वाचाCrime News: क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचा बनाव, 12 तरुणींवर अत्याचार, 'असा' अडकला लखोबा)

बाळासाहेब थोरात यांचे भाचे विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दोन-दोन रूम घेतल्या आहेत. यामुळे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article