Crime News: बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, पायावर नाक घासायला लावलं; क्लासमधील मुलींचा वाद टोकाला पोहचला

संदीप लंके हा सतत आपला भाऊ पोलीस असून, आपलं काही होत नाही, अशा धमक्या शिंदे कुटुंबियांना देत होता. मारहाणीची माहिती मिळाल्यावर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले, तेव्हा माझे नाव संदीप लंके पाटील आहे काय करायचे ते करा.

जाहिरात
Read Time: 3 mins

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला की, एका मुलीच्या पालिकांनी दुसऱ्या मुलीच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. धक्कादायक म्हणजे तू आता आमच्यासमोर नाक घास, असे म्हणत एकाने महिलेचे केस ओढून तिचं तोंड फरशीवर व मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या पायांवर जोराने रगडले. हातात रॉड, दांडे घेऊन या महिलेच्या पतीला मारहाण होत असल्याने ती पतीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यांना सोडण्यासाठी विनवणी करत होती. मात्र ,आरोपींनी मारहाण काही थांबवली नाही आणि महिलेला देखील बेदम मारहाण केली .या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप श्रीधर शिंदे आणि छाया शिंदे असे मारहाण झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.

संदीप शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या दोन्ही मुली एका खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान मुलीचा तिच्या क्लासमधील दुसऱ्या मुलीसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी मध्यस्थी करून त्या दोघींना समजावून सांगुण गैरसमज दूर करुन वाद मिटवला होता. त्यानंतर त्या मुलीचे वडील संदीप लंके हे संदीप शिंदे यांच्या दुकानावर येऊन तुझी मुलगी कुठे आहे, तिला मला मारायचे आहे, तिला समोर बोलव, तिने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केले आहे, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी संदीप शिंदे यांच्या वडीलांनी दोघांमध्ये समजूत घातली अन् वाद मिटवला.

Advertisement

(नक्की वाचा-  Nashik News: विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहीरीत घेतली उडी, भयंकर कारण आलं समोर)

हातात दांडे व रॉड घेऊन थेट घरात घुसले

वाद मिटला असतानाही मंगळवारी संदीप लंके पुन्हा संदीप शिंदेंच्या घरी आले. यावेळी संदीप लंके व त्याची पत्नी त्यांचे सोबत दोन अनोळखी इसम हातात दांडे व रॉड घेऊन थेट घरात घुसले. "तुझी मुलगी कुठे आहे मला तिला मारायचे आहे" असे म्हणून ते ओरडू लागले. संदीप लंके याने त्याचे हातातील दांड्याने संदीप शिंदे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने रॉडने शिंदे यांना मारहाण सुरु केली. संदीप लंके यांची पत्नी यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली.

Advertisement

शिंदेंच्या पत्नीला बेदम मारहाण

घरात सुरू असलेला आरडाओरडा ऐकुन संदीप शिंदे यांची पत्नी घराच्या वरच्या मजल्यावरुन खाली आल्या. तसेच माझ्या पतीला का मारत आहेत असे बोलत असतांनाच संदीप लंके याचे पत्नीने शिंदेंच्या पत्नीचे केस धरुन तिला डोक्यावर आपटून तिला मारहाण सुरू केली. यावेळी शिंदे पती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी शेवटी शेजारच्या एका महिलेने धाडस करत संदीप लंकेला दरवाजा उघडण्यास लावला. दरवाजा उघडताच संदीप शिंदेंच्या पत्नीने घरातून पळ काढला आणि शेजारच्या घरात जाऊन लपल्या. तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

(नक्की वाचा - Anti pregnancy pills: पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक गोळी, यशस्वी चाचणीत 'या' गोष्टी आल्या समोर)

माझा भाऊ पोलीस

संदीप लंके हा सतत आपला भाऊ पोलीस असून, आपलं काही होत नाही, अशा धमक्या शिंदे कुटुंबियांना देत होता. मारहाणीची माहिती मिळाल्यावर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले, तेव्हा माझे नाव संदीप लंके पाटील आहे काय करायचे ते करा. माझा भाऊ पीआय आहे, असं तो पोलिसांसमोर उद्धटपणे बोलत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

Topics mentioned in this article