ठाणे आणि सीएसएमटी स्थानकाचं रूंदीकरण करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनालयाकडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. मेगा ब्लॉक असल्यामुळे 534 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याणहून सुटणाऱ्या लोकल रद्द झाल्याने कल्याण डोंबिवली स्थानकात एकच गर्दी उडाली. या गर्दीमुळे प्रवाशांनी दिवा स्थानकात येण्यापूर्वी लोकल डब्याचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवासी संपातले. त्यांनी लोकल डब्याचा दरनाजा फोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला.
मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवारी मेगा ब्लॉकचा दिवस सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी मात्र प्रवासांना मोठा फटका सहन करावा लागला. त्यात शनिवारी शुक्रवारपेक्षा अधिक लोकल रद्द केल्याने प्रवाशांची मोठी गर्दी मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावर जमा झाली.
नक्की वाचा - मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल
कल्याणहून सुटणाऱ्या लोकल रद्द केल्याने लांबून येणाऱ्या लोकल कल्याण ठाकूर्ली आणि डोंबिवली स्थानकातच मोठी गर्दी जमा होत होती. त्यामुळे या प्रवाशांनी दिवा स्थानकात येण्याआधीच लोकलचे दार बंद केले. त्यानंतर दिवास्थानकातून प्रवास करणारे प्रवासी संतप्त झाले. प्रवाशांनी बंद केलेले लोकलचे दार फोडून प्रवाशांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या स्थानकात एकच गोंधळ झालेला पाहिला मिळाला. एकंदरीत शनिवारचा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला.