जाहिरात

Pune News : "डॉन म्हणतात डॉन..", पुण्यात आला नवा VIP, डांगे चौकात रिक्षाचा पाठलाग करून बनवला व्हिडीओ

पुण्यातील डांगे चौकात जाणाऱ्या रिक्षाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

Pune News :  "डॉन म्हणतात डॉन..", पुण्यात आला नवा VIP,  डांगे चौकात रिक्षाचा पाठलाग करून बनवला व्हिडीओ
Pune Dange Chowk Video Viral
पुणे:

Pune Viral Video :  पुण्यातील रस्त्यांवर ट्रॅफिक, हॉर्न आणि भन्नाट दृष्य दिसणे ही एक सामान्य बाब आहे. डांगे चौकाजवळ प्रवाशांची गर्दी,ऑटो रिक्षा, कार आणि दुचाकीचा प्रवास पाहायला मिळतो. पण या वर्दळीत एक सुंदर अन् अनोखा क्षण सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. एका रिक्षाच्या आत कोणीही प्रवासी बसला नव्हता, पण त्या रिक्षावर एक कुत्रा मात्र आरामात बसला होता.तो एक व्हिआयपीच आहे, अशा अर्विभावातच हा कुत्रा रिक्षाच्या वर बसला होता. कुत्र्‍याचा आत्मविश्वास, शांतपणा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

व्हिडीओत पाहू शकता की, रिक्षा जस जशी पुढे जाते, तसतसं कॅमेरा रस्त्यावरील सर्व नजारा कैद करतो. रस्त्यावर खूप गजबज जरी असली तरी कुत्रा मात्र शांतपणे रिक्षाच्या राईडचा आनंद घेतो. जसं की त्याला कोणाचीच भीती नाहीय, अशाच अॅट्यिट्यूडमध्ये हा कुत्रा प्रवास करत असतो. व्हिडीओच्या शेवटी दिसतंय की, रिक्षा ट्रॅफिकमधून बाहेर पडते.तरीही कुत्रा आरामात रिक्षाच्या रूफवर बसलेला असतो. या व्हिडीओला शेअर करत जबरदस्त कॅप्शन देण्यात आलं आहे. 'डॉन म्हणतात डॉन', असा मजेशीर मेसेज या व्हिडीओमध्ये लिहिला आहे. 

नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर

लोकांनी दिल्या जबरदस्त प्रतिकिया

5 फेब्रुवारीला शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळाले आहेत. तसच या व्हिडीओला यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलं, डॉगेश भाई बोलतात मला..दुसऱ्या एकाने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलंय, ही रिक्षा त्याचीच आहे. फक्त भाड्याने दिली आहे.

5 फरवरी को शेयर किए गया यह वीडियो थोड़े ही समय में बहुत तेजी से वायरल हो गया. वीडियो कई मिलियन से ज्यादा व्यूज मिल चुके हैं और कमेंट्स की भरमार हो गई है. इस वीडियो को देखने बाद एक यूजर ने लिखा कि “Dogesh bhai bolte.” दूसरे ने मजाक करते हुए लिखा कि ये रिक्शा उसी का है, चलाने के लिए किराए पर दिया है.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com