Dombivali News: काटई नाक्याजवळ MIDC ची  मोठी जलवाहिनी फुटली! शहरात पाणी टंचाई होणार? Video पाहून धक्काच बसेल

डोंबिवली-कल्याण शिळ रस्त्यालगत काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मोठी जलवाहिनी फुटली. यामुळे रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. व्हायरल व्हिडीओ पाहून धक्काच बसेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivali Midc Pipeline Video
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Dombivali Pipeline Video Viral : डोंबिवली-कल्याण शिळ रस्त्यालगत काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मोठी जलवाहिनी फुटली. मेट्रोच्या काम सुरु असतानाच ही पाईप लाईन फुटली, अशी माहिती एमआयसीडी अधिकाऱ्यांनी दिली आहे.पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे मोठे फवारे उडाले आणि सखल भागात पाणी साचलं. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून एमआयडीसीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.एमआयडीसीकडून पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने ठाणे आणि नवी मुंबईत काही काळ पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते.

बारवी धरणातून या पाईपलाईनद्वारे ठाणे नवी मुंबईत पाणीपुरवठा

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली-कल्याण शिळ रस्त्याजवळ असलेल्या काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मोठी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे फवारे उडाले.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.परंतु,शहरात पाणी टंचाई होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. एमआयडीसीची ही पाईपलाईन 1800 mm ची आहे. बारवी धरणातून या पाईपलाईन द्वारे ठाणे नवी मुंबई या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन फुटल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. 

नक्की वाचा >> Navi Mumbai : मार्केटला जाण्याआधी सावध व्हा! नवी मुंबईत बुर्का गँगची एन्ट्री, सीवूडमध्ये सशस्त्र दरोडा, Video

इथे पाहा पाईपलाईन तुटल्याचा व्हिडीओ

आज एमएमआरडीएचा माध्यमातून मेट्रोच्या काम सुरु होतं. पण त्याचदरम्यान ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं असून रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. ही पाईपलाईन फुटल्याने वाहतूक कोंडीही झाली. दरम्यान, एमआयडीसीकडून पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.  

नक्की वाचा >> पत्नीसोबत बुलेट राईड..CSK ने शेअर केला फोटो, T-20 वर्ल्डकपही खेळणार, स्टार क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का?