जाहिरात

पत्नीसोबत बुलेट राईड..CSK ने शेअर केला फोटो, T-20 वर्ल्डकपही खेळणार, स्टार क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का?

जो फोटो तुम्ही पाहिला आहे, त्यात ब्लॅक बुलेटवर बसलेला व्यक्ती भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. या खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात यंदाच्या टी-20 वर्ल्डकपसाठी निवडही झाली आहे. ओळखा पाहू..

पत्नीसोबत बुलेट राईड..CSK ने शेअर केला फोटो, T-20 वर्ल्डकपही खेळणार, स्टार क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का?

Star Cricketer With Wife Viral Photo :  जो फोटो तुम्ही पाहिला आहे, त्यात ब्लॅक बुलेटवर बसलेला व्यक्ती भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. या खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात यंदाच्या टी-20 वर्ल्डकपसाठी निवडही झाली आहे. या खेळाडूचे कोट्यवधी चाहते आहेत. या स्टार खेळाडूसोबत बुलेटवर त्याची पत्नी बसलेलीआहे. पण त्याने चेहऱ्यावर हेल्मेट घातले आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमध्ये या खेळाडूच्या अनेक अप्रतिम इनिंग्ज पाहिल्या असतील.पण सीएसकेच्या सोशल हँडलवर शेअर केलेल्या फोटोत त्याला ओळखणे खूपच कठीण बनलं आहे. कोण आहे भारताचा हा स्टार खेळाडू, ज्याचा फोटो इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे, जाणून घेऊयात. 

 फोटोत दिसणारा क्रिकेटपटू आहे तरी कोण?

बुलेटवर पत्नीसोबत बसलेला हा क्रिकेटपटू टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन आहे. सोमवारी संजू सॅमसनच्या या खास फोटोसोबत चेन्नई सुपर किंग्जने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजू सॅमसन यंदा आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळताना दिसणार आहे. तसेच त्याला टी-20 वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघातही स्थान मिळाले आहे.

Sanju Samson With Wife Viral Photo

Sanju Samson With Wife Viral Photo

नक्की वाचा >> Asia Cup Video: पाकिस्तानी गोलंदाजाने खिल्ली उडवली, वैभव सूर्यवंशीही असा भिडला..पाकड्यांच्या कायम लक्षात राहिल

संजू सॅमसन आणि चारुलता रमेश यांची लव्ह स्टोरी

Latest and Breaking News on NDTV

चारुलता रमेश असं संजू सॅमसनच्या पत्नीचं नाव आहे. त्या तिरुवनंतपुरमच्या रहिवासी आहेत. चारुलताने तिचे शालेय शिक्षण त्या शहरातच पूर्ण केले आहे. तिने इव्हानिओस कॉलेजमधून रसायनशास्त्रात विज्ञान पदवी मिळवली आहे. संजू सॅमसन आणि चारू यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com