Dombivali News: 'धुरंधर'चं शुटींग ज्या पुलावर झालं, तो माणकोली पुल पुन्हा चर्चेत, यावेळी कारण काय?

या प्रकरणात भिवंडी नारपोली आणि डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी तपास सुरु केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मोठागाव माणकोली खाडी उड्डाणपुलावर काही कार चालकांनी गाड्यांची जीवघेणी शर्यत लावल्याची घटना समोर आली आहे
  • भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कार रेसिंगचा व्हिडिओ पोलिसांना दिला आणि कारवाईची मागणी केली होती
  • विष्णूनगर पोलिसांनी चौघा कार चालकांचा शोध घेतला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
डोंबिवली:

अमजद खान

धुरंदर चित्रपटाचं ज्या पुलावर शूटिंग झालं तो मोठागाव माणकोली खाडी उड्डाणपुल परत एकदा चर्चेत आला आहे. या पुलावर गाड्यांची शर्यत लावल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार कार चालकांच्या विरोधात मोठी कारवाई करीत दंड आकारला गेला आहे. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणात कार रेसिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. ही बातमी NDTV मराठीने सगळ्यात प्रथम दाखवली होती.
 

डोंबिवलीत ठाण्याला जोडणारा मोठागाव माणकोली खाडी पूल तयार करण्यात आला आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या पूलावर काही कार चालक गाड्यांची जीवघेणी शर्यत लावत आहे. तेवढ्यावरच ते थांबत नाही. तर त्याचा व्हिडिओ ही तयार करीत होते. हा व्हिडिओ भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पोलिसांना शेअर करीत पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. 

नक्की वाचा - Dombivali news: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

या प्रकरणात भिवंडी नारपोली आणि डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या तपासात पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे गाड्यांच्या नंबरचा शोध घेतला. या प्रकरणात चार कार चालकांना पोलिसांनी शोधून काढले आहे. या मध्ये स्कार्पिओ, थार आणि अन्य गाड्यांचा समावेश आहे. या प्रकरणात थार जीप चालक पियूष म्हात्रे, हुंडाई वेरणा चालक वेदांत सावंत, स्कार्पिओ चालक प्रदीप ढाकणे, व्हिडिओ तयार करणारा विशाल विश्वकर्मा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक घोटाळा, जेलमध्ये हवा खाणाऱ्या कर्मचाऱ्याला 40 दिवस पगार

इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही तरुणांनी मैत्री केली. हे सगळे चांगल्या घरातील तरुण आहे. त्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. 26 जानेवारीला या ग्रुपवरुन कार रेसिंग करण्याचा मेसेज दिला गेला. सर्व तरुण त्याठिकाणी जमा झाले. त्यानंतर रेसिंग केली. या जीवघेण्या रेसिंगमध्ये कोणाचाही जीव गेला असता. ही रेसिंग अनेक दिवसांपासून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अन्य कार चालकांचाही शोध घेत आहेत.

Advertisement