अमजद खान, डोंबिवली
रील स्टार सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीला एअर होस्टेस म्हणून नोकरी लावून देतो सांगून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सुरेंद्र पाटीलवर आहे. गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील हा पसार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुरेंद्र पाटील विरोधात याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेंद्र पाटील आता पुन्हा चर्चेत आहे. त्याच्या विरोधात एका तरुणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणी ही पुण्याला राहते. सुरेंद्र पाटील याचे रील्स पाहून या तरुणीने सुरेंद्र पाटील याच्याशी मैत्री केली. या तरुणीला सुरेंद्र पाटील याने एअर होस्टेसची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
बंदुकीचा धाक दाखवून कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील सुरेंद्र पाटीलने दिली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. त्याला माहिती मिळताच तो पसार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)
कोण आहे सुरेंद्र पाटील?
डोंबिवली पूर्वेतील ठाकूर्ली परिसरात सुरेंद्र पाटील याचा वाईन शॉप आणि इतर दुकाने आहेत. सुरेंद्र पाटील हा एक रील स्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रावर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलीस स्टेशनमध्ये रील तयार केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक देखील झाली आहे.
(नक्की वाचा- Beed News : "...आता सहनशीलता संपली", अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान शिक्षक ढसढसा रडला)
दोन वर्षापूर्वी मानपाडा पोलिस ठाण्यात काही कामानिमित्त सुरेंद्र पाटील गेला होता. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये कुणी नसताना अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून रील बनवली होती. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.
पैशाच्या पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवून भोंदू बाबांनी सुरेंद्र पाटीलला 40 लाखाचा गंडा घातला होता. या प्रकरणात जेव्हा आरोपींना अटक झाल्यानंतर त्याला पैसे परत दिले. त्यावेळी त्याने त्या पैशांसोबत रील तयार केली होती. त्या प्रकरणातही त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती.