
Dombivli News: डोंबिवलीमधल्या प्रेम कुमार या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मुलानं उपचाराच्या नावाखाली आश्रय ट्रस्टच्या समोर सोडून देण्यात आले होते. या धक्कादायक प्रकाराला 'NDTV मराठी' नं वाचा फोडली होती. या बातमीचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेनं प्रेम कुमार यांची सर्व जबाबदारी उचलली आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत हॉस्पिटलमध्ये जात कुमार यांची भेट घेतली. त्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे आश्वासन दिले.
काय आहे प्रकरण?
प्रेम कुमार यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार यांनी राकेश कुमार आश्रय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दाखल केले. पण, नंतर त्यानं पुन्हा वडिलांची विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन केला नाही. राकेश डोंबिवली पश्चिमेतल्या गुप्ते रोडवर श्रीगंगोत्रीा सोसटीमध्ये राहतो. पण, त्याने वडिलांशी सर्व संपर्क तोडला आहे.
( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
राकेश वडिलांना जेवण, पाणी काही देत नव्हता. त्यामुळे प्रेमकुमार यांना शीव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचबरोबर पुन्हा शीव रुग्णालयातून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेमचंद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
'NDTV मराठी' नं ही बातमी प्रसिद्ध करताच त्याचे पडसाद उमटले. शिवसेना कायमच रंजल्या गांजलेल्यांच्या तसेच गरजूंच्या मदतीला उभी राहत असून मुलाने वाऱ्यावर सोडलेल्या या जेष्ठ नागरिकाची जबाबदारी घेतं असल्याचं आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं.
( नक्की वाचा: Dombivli: कल्याण स्टेशनवर भेटला तरुण, अकोल्यात नेलं, डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीबाबत भयंकर घडलं! )
तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात आम्ही तुमची मुले म्हणून तुमची काळजी घेऊ, असं आश्वासन मोरे यांनी प्रेम कुमार यांना यावेळी दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world