डोंबिवलीमध्ये एका फळ विक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फळविक्रेता आपल्या हातगाडीजवळ उभा राहून प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करताना दिसत आहे. त्यानंतर हात न धुता ग्राहकांना फळ विक्री करत होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनां संताप व्यक्त केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मानपाडा पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी केली आणि फळ विक्रेत्याला अटक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अली खान असे 20 फळ विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी फेरीवाल्याच्या सामानाची तोडफोड करून त्याला मारहाण केली.
(नक्की वाचा - 'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा )
मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान असं या 20 वर्षीय फळ विक्रेत्याचं नाव आहे. हा व्हिडीओ निलजे भागातील लोढा परिसरातील आहे. भारतीय दंड संहिता कलम 271 (धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता, निष्काळजीपणा), 272 आणि 296 (अश्लीलता) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोंबिवलीकरांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे.
(नक्की वाचा- "भारत जळणार नाही, तर सूर्याप्रमाणे प्रकाश देणार", PM मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 ठळक मुद्दे)
मनसे आक्रमक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या घटनेनंतर आक्रमक झाले . मनसे पदाधिकारी विनोद पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना धारेवर धरत लोढा परिसरात असलेल्या फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाईची मागणी केली. अनाधिकृत फेरीवाले सोमवारपासून दिसता कामा नये, अशी ताकीद अधिकाऱ्यांना त्यांनी दिली. त्यानंतर या परिसरात संबंधित फळ विक्रेत्यासह काही फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आज अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पोलीस आणि केडीएमसी कारवाई करणार असल्याची माहिती आहे.