Dombivli News: डोंबिवलीत पाणी टंचाई! 3 महिने नाही पाणी, रिकामे हंडे घेत महिलांनी थेट, जे काही केलं ते...

आमच्याच साईनगरवर अन्याय का अशी विचारणा ही या निमित्ताने महिलांनी केली. यावेळी महिला अधिकाऱ्या समोर भलत्याच आक्रमक झाल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • डोंबिवली पश्चिमेतील साई नगर परिसरात तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे
  • लोकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार केल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही
  • नागरिकांनी विशेषतः महिलांनी महापालिका ह प्रभाग कार्यालयावर रिकाम्या हंड्यांसह मोर्चा काढला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
डोंबिवली:

अमजद खान 

पावसाळा बऱ्या पैकी लांबला आहे. त्यामुळे एकीकडे लोक उकाड्याने हैराण आहेत. तर दुसरीकडे पाण्याची टंचाई अनेक भागात जाणवत आहेत. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर कुणी टँकरच्या पाण्याचा वापर करत आहे. कल्याण डोंबिवलीत तर पाणी टंचाई ही नित्याचीच झाली आहे. त्यात ही डोंबिवली पश्चिमेला असलेल्या साई नगर परिसरातली स्थिती सर्वाधिक भीषण म्हणावी लागेल. इथं एक दोन नाही तर तिन महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही कुठे डोंगरात राहतो की महापालिकेत राहतो अशी म्हणण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. त्यांनी आपला संताप बोलून दाखवला आहे.  

डोंबिवली पश्चिमेतील साई नगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर सुटला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे परिसरातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. शेवटी  शेकडो महिलांनी एकत्र येत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  'ह' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे घेत महापालिकेच्या कार्यालयावर हल्ला बोल केला. हातात बोर्ड  डोक्यावर रिकामे हंडे, आणि घोषणांनी या महिलांनी महापालिकेचे कार्यलय दणाणून सोडले होते. 

Advertisement

नक्की वाचा - Rohini Paradhye: रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट, 'ही' व्यक्ती खरी सुत्रधार, गुन्हा दाखल

महिलांच्या शिष्टमंडळाने यावेळी तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी या अधिकाऱ्याला महिलांनी चांगलेच धारेवर धरले. तिन महिने महापालिका काय करत होती असा जाब त्यांनी संबंधी अधिकाऱ्याला विचारला. वारंवार तक्रारी केल्या. तरी महापालिका प्रशासन निवांत होतं. त्यांना नागरिकांचं काही पडलं आहे की नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. ऐन उन्हाळ्यात हक्काचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पाणी येत नाही तरी ही तुम्ही पाणीपट्टी घेणार की नाही असा प्रश्न ही काही महिलांनी केला आहे. आमच्याच साईनगरवर अन्याय का अशी विचारणा ही या निमित्ताने महिलांनी केली. यावेळी महिला अधिकाऱ्या समोर भलत्याच आक्रमक झाल्या होत्या. 

नक्की वाचा - Video: समोसा, कचोरीसाठी पायाने तुडवला मैदा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, Video पाहून म्हणाल...

त्यांचा आक्रमक पणा पाहून पाण्याची किती भीषण टंचाई त्या भागात असेल याची कल्पना येत होती. दैनंदिन गरजांसाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी आज परिसरातील शेकडो महिला डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या. 'ह' प्रभाग कार्यालयावर काढण्यात आलेल्या या हंडा मोर्चामध्ये महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाणी समस्या त्वरित सोडवण्यात यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलक महिलांनी दिला आहे. अधिकाऱ्यानेही पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन तुर्तास तरी दिले आहे.