डोंबिवलीतील प्रसिद्ध पेंढारकर महाविद्यालय विनाअनुदानित करावे अशी मागणी पेंढारकर कॉलेजच्या संचालकांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी कार्यवाही सुरू केली असून अनुदानित शिक्षकांना देखील त्यांनी एका वर्गात बसवले आहे. विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही असा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे भवितव्य देखील अंधारात सापडले आहे. यासाठी आज शिक्षक तसेच महाविद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी बेमुदत साखळी उपोषण छेडले असून या उपोषणाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थिती लावली होती.
या महाविद्यालयातील संचालक मंडळाने घातलेला घाट आम्ही उद्ध्वस्त करू आणि या महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार असल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी देखील आम्हाला यावर्षी भरमसाठ फी भरावी लागली असून सुविधाही देण्यात येत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे याबाबत आढावा घेतला आहे.
नक्की वाचा - ही वाट दूर जाते, पण कुठे? कोस्टल रोड खुला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाहनांचा 'स्पीड' कमी
डोंबिवलीत 'सेव्ह पेंडारकर कॉलेज' मोहीम
सेव्ह पेंडारकर कॉलेजचा नारा देत आज शुक्रवारी 14 जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून माजी विद्यार्थी कॉलेजच्या गेटसमोर जमा झाले होते. सरकारची मान्यता नसताना कॉलेज प्रशासनाकडून कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट घातला जात आहे. यावरून माजी विद्यार्थ्यांनी विरोध व्यक्त केला. कॉलेज विनाअनुदानित झाल्यास शैक्षणिक शुल्कात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल. कॉलेज प्रशासनाच्या कारवाईविरोधीत माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण करण्याचं ठरवलं होतं. विशेष म्हणजे पेंढारकर कॉलेज बचाव मोहिमेला 15 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world